
चाऱ्यांच्या वारसदारांस नगर पंचायत सेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी जळकोटच्या तहसील कार्यालयासमोर पात्र लाभार्थी व नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. रमाई आवास योजनेच्या मंजूर यादीतील पात्र लाभार्थ्यांना तत्काळ कार्यारंभ आदेश व पहिला हप्ता देण्यात यावा, उर्वरित लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी तसेच सफाई कामगारांच्या वारसांना नगर पंचायतीच्या सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी वारंवार करूनही त्याबाबत कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे तहसीलदार, जळकोट यांना व सर्व संबंधितांना निवेदन देऊन यासाठी आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. मात्र निवेदनाची दखल घेण्यात आली नसल्याने आज भारिप बहुजन महासंघाचे जळकोट तालुकाध्यक्ष संग्राम कदम यांच्या नेतृत्वाखाली जळकोटच्या तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
संग्राम कदम यांच्यासह सफाई कामगार संजय पंढरी कांबळे, लक्ष्मीबाई सोनकांबळे, जया रोहिदास मोरे, उज्ज्वला अशोक कदम, कालिंदा विलास कोकणे, धुरपतबाई गोविंद मोरे आदीजणांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या निवेदनावर सुनील नामवाड, राजाबाई गुंडिले, अशोक कदम, सोपान तोगरे, पुंडलिक नामवाड, चांदू दहिकांबळे, संभाजी तोगरे, गोविंद बनसोडे, सुभाष गायकवाड, अशोक कपाळे, बालाजी सोनकांबळे, विलास कोकणे, महादेवी नामवाड, नितीन नामवाड, कविता नामवाड राधाबाई नामवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या सर्वांनी उपोषणास पाठिंबा दिला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहील, असे तहसीलदार, जळकोट यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


































































