
बंगाली सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि पश्चिम बंगाल येथील बशीरघाटकडून तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहां हिचा आज वाढदिवस आहे.

8 जानेवारी, 1990 ला कोलकातामध्ये नुसरत जहां हिचा जन्म झाला. आज हिने वयाची तिशी गाठली असून 31 व्या वर्षामध्ये पदार्पण केले आहे.

खासदार झाल्यानंतर तिचे मॉडेलिंगमधील दिलखेचक फोटो व्हायरल होत असतात. अनेकदा तिच्या फोटोंवरून वादही होतात, तर कधी ग्लॅमरस फोटोंवर चाहत्यांच्या उड्या पडतात.

अनेकदा धर्मनिरपेक्षता आणि परंपरा तोडणारे मेसेज फोटोसह व्हायरल करणारी नुसरत चर्चेचा विषय असते. ट्रोलर्स आणि धर्मांधांना न घाबरती ती आपल्याला पटेल ते करते.

अभिनयासह राजकारणात पाऊल ठेवलेल्या अभिनेत्री नुसरत जहां हिने गेल्यावर्षी तृणमूल काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली. पश्चिम बंगालमधील बशीरहाट मतदारसंघातून ती उभी राहिली होती आणि जिंकलीही.

निवडणूक जिंकल्यानंतर नुसरत पाश्चात्य कपड्यांमध्ये संसदेमध्ये पोहोचली त्यामुळे ट्रोलर्सने तिला ट्रोलही केले. यानंतर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ती साडीमध्ये संसदेत पोहोचली आणि आपल्या पहिल्याच भाषणाद्वारे सर्वांचे मन जिंकले.

निवडणुकीदरम्यानच नुसरत हिने कोलकाता येथील उद्योगपती निखील जैन याच्याशी विवाह केला. हिंदू पद्धतीने विवाह केल्याने आणि मंगळसुत्र घातल्याने धर्मांधांनी तिच्याविरोधात फतवाही काढला.

धर्मांधांच्या फतव्याला न घाबरता नुसरत हिंदू धर्माच्या विविध सणांमध्ये सहभागी झाली. पश्चिम बंगालमधील दुर्गापुजावेळी ती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह उपस्थित होती.

अभिनेत्री ते खासदार असा प्रवास केलेली नुसरत जहां सोशल मीडियावर आपले ग्लॅमसर फोटो अपलोड करत असते. खासदार असतानाही आपली आवड जपणाऱ्या नुसरत नेटकऱ्यांच्या कौतुकाचा विषय आहे.






























































