आपची 70 उमेदवारांची यादी जाहीर, 15 आमदारांची कापली तिकिटे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने 70 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी 15 विद्यमान आमदारांची तिकिटे कापली असून 9 महिला उमेदवारांना संधी दिली आहे.

आम आदमी पक्षाने आपली 70 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री केजरीवाल हे नवी दिल्ली तर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया पटपडजंग मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. दिल्ली विधानसभेच्या सर्वच्या सर्व 70 जागांवरील उमेदवारांची यादी आपच्या संसदीय समितीच्या बैठकीत मंगळवारी निश्चित करण्यात आली. गेल्या विधानसभा निवडणुकीत आपने 67 जागा जिंकल्या होत्या. यंदा पक्षाने 46 विद्यमान आमदारांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तसेच 15 आमदारांची इकेटे कापली आहेत. पक्षाने तीन आयारामांना निवडणुकीचे तिकीट दिले आहे. नारायण दत्त शर्मा यांचे तिकीट कापून काल आलेले राम सिंह यांना पक्षाने तिकीट दिले आहे. त्यामुळे नाराज शर्मा यांनी पक्षाला राम राम ठोकत केजरीवल आणि सिसोदिया यांच्यावर तिकीट विकल्याचा आरोप केला आहे.