
एमआयएम पक्षाचे माजी आमदार वारीस पठाण यांनी वादग्रस्त वक्त्यव्य केले आहे. आमच्या 15 कोटी महिला 100 वर भारी पडतील असे वक्तव्य त्यांनी केले आहे. कर्नाटक राज्यातील गुलबर्गामध्ये CAA विरोधात एमआयएम पक्षाची सभा होती. तेव्हा त्यांनी जे वक्तव्य केले आहे.
15 फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेत वारीस पठाण म्हणाले की, “शाहीन बागमध्ये CAA विरोधात आंदोलन सुरू आहे. ते लोक बोलायला लागले की महिलांना पुढे केले. आता फक्त महिला पुढे आल्या आहात तर तुम्ही घाबरलात. आम्ही सगळे एकत्र आलो तर काय होईल? 15 कोटीच आहेत परंतु 100 वर भारी आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा. असे पठाण म्हणाले.
#WATCH AIMIM leader Waris Pathan: …They tell us that we’ve kept our women in the front – only the lionesses have come out&you’re already sweating. You can understand what would happen if all of us come together. 15 cr hain magar 100 ke upar bhaari hain, ye yaad rakh lena.(15.2) pic.twitter.com/KO8kqHm6Kg
— ANI (@ANI) February 20, 2020
या सभेत पठाण यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. तसेच एकजूटीचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, माफी मागणार नाही – वारीस पठाण




























































