
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानला उपांत्य फेरीत पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलणाऱया 16 वर्षीय शफाली वर्मा हिने आयसीसीच्या टी-20 रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. महिलांच्या फलंदाजी रँकिंगमध्ये तिने 19 स्थानांनी मुसंडी मारली आहे हे विशेष.
शफाली वर्मा हिने टी-20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 29 धावांची, बांगलादेशविरुद्ध 39 धावांची, न्यूझीलंडविरुद्ध 46 धावांची, श्रीलंकेविरुद्ध 47 धावांची खेळी करीत हिंदुस्थानच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्यामुळेच तिला रँकिंगमध्ये आगेकूच करता आली आहे. दरम्यान, गोलंदाजांच्या यादीत सोफी एक्सेस्टोन ही पहिल्या स्थानावर विराजमान आहे.




























































