
लॉकडाऊन असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी वाघबीळ येथे दोन शेकरूंची शिकार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्या आठवड्यात 2 एप्रिल ला ही घटना घडली. वन विभागाने या प्राण्यांची शिकार केलेल्या शिकाऱ्यास आज अटक केली. शिकार केलेल्या प्राण्यांसह शिकाऱ्याने काढलेले छायाचित्र व्हॉट्सअपवर शेअर झाल्याने ही घटना उघड झाली असून शिकाऱ्याचे नाव लिलाधर मिनानाथ वराडकर वय वर्ष २५, रा कुणकेरी-वाघबीळ ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग असे आहे.
शिकारी हा सैन्यदलामध्ये असून तो सुट्टीवर गावी कुणकेरी येथे आला होता. दरम्यान सुट्टी संपल्यानंतर त्याने युनिटशी परतीबाबत विचारणा केली असता युनिटने लॉक डाऊन संपल्यानंतर हजर राहण्याची सूचना केली होती. संशयित आरोपी हा गेले तीन वर्षापासून सैन्यात आहे. कुणकेरी येथील वाघबीळ परिसरात त्याने शेकरू प्राण्याची शिकार केली व पाण्याच्या मृतदेहासोबत फोटो देखील काढले. आज सावंतवाडी वन अधिकाऱ्यांनी संशयित आरोपीस सावंतवाडी येथील न्यायालयात हजर केले असता व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयाने आरोपीस 14 एप्रिल पर्यंत वनकोठडीचा आदेश दिला































































