बुलढाण्यात तिघांनी कोरोनाला हरविले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेड झोन मध्ये नुकताच समावेश झालेल्या बुलढाण्यातील लोकांना दिलासा देणारी ही बातमी आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या बुलढाणा शहरातील एका व्यक्तीच्या निकट संपर्कातील तीन पॉझिटिव्ह रुग्णांच्या दुसऱ्या चाचणीचे अहवाल शुक्रवारी निगेटिव्ह आले. वैद्यकीय सोपस्कार पार पडल्यानंतर या तिघांनाही रुग्णालयातून सुटी देण्यात आली. पुढील 14 दिवस या तिघांनाही गृह विलगीकरणात (home quarantine) ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यानी सांगितले.