कोरोनामुक्त झालेल्या बीड जिल्ह्यात अशी सुरूय तगडी तयारी, एकावेळी 4200 रुग्ण घेऊ शकतील उपचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज बीड जिल्हा कोरोना मुक्त झाला असला तरी प्रत्येक नागरिकाला कोरोनाचा लढाई आगामी काळात लढावी लागणार आहे, गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास या परिस्थितीचा सामना करण्यासाठी तगडी तयारी करण्यात आली आहे. एका वेळी 4200 रुग्ण बीड जिल्ह्यात उपचार घेऊ शकतील. 150 खासगी तज्ञ डॉक्टरांना प्रशिक्षण दिले गेले आहे, 74 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत, सात खासगी रुग्णालये अधिग्रहित केली जाऊ शकतील, कोव्हिड 19 च्या रुग्णासाठी तीन टप्पे करण्यात आले आहेत.

राज्यात 778 नवीन रुग्ण; कोरोनाबाधितांचा आकडा 6427 वर, 840 रुग्ण बरे होऊन घरी! – आरोग्यमंत्री

बीड जिल्ह्यातील एकमेव कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा दुसरा ही अहवाल निगेटिव्ह आल्याने बीड जिल्हा कोरोना मुक्त झाला असला तरी प्रशासनावर मोठी जबाबदारी अजूनही आहे. एकीकडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार 440 आरोग्य टीमच्या माध्यमातून कोरोनाचा लढाई लढत असताना जिल्हाशल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी उपचाराची तगडी तयारी पूर्ण करत आहेत. एकावेळी 4200 रुग्णावर तातडीने उपचार करण्यात येतील त्यासाठी 3 टप्पे करण्यात आले आहेत. यात कोव्हिड केअर सेंटर मध्ये 2250 असे रुग्ण ठेवले जातील. ज्यात कोरोनाचे लक्षण नाहीत पण अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत यासाठी समाजकल्याण, आय टी आय, खाजगी शिक्षण संस्थेचे वसतिगृह ताब्यात घेण्यात आले आहेत. त्याची क्षमता 2850 रुग्णाची असणार आहे.

screenshot_2020-04-23-22-16-44-144_com-google-android-gm

दुसरा टप्पा कोव्हिडं हेल्थ सेंटर, त्यात 750 बेड असणार आहेत. यात लोखंडी सावरगाव येथे 300 बेड, गेवराई उपजिल्हारुग्णालयात 50, आष्टी येथे 30 बेड, बीड जिल्ह्यात अधिग्रहित केलेल्या सात रुग्णलयात 350 बेड असणार आहेत. तिसरा टप्पा गंभीर रुग्णासाठीचा आहे. त्यासाठी 750 बेड तयार ठेवले आहेत, यात बीड जिल्हारुग्णालयात 250 बेड, अंबाजोगाई मेडिकल कॉलेज मध्ये 250 बेड तर परळी, केज, लोखंडी सावरगाव येथे मिळून 250 बेड आहेत. गंभीर रुग्णाच्या उपचारासाठी सेंट्रल ऑक्सिजनची व्यवस्था केली गेली आहे. 150 खासगी तज्ञ डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सध्या 20 व्हेंटिलेटर तयार आहेत, अजून 30 व्हेंटिलेटरची मागणी आहे, तर खासगी रुग्णालयातील 57 व्हेंटिलेटर ताब्यात घेतले जाणार आहेत.

कोरोना रुग्णांचे मृत्यू रोखा! रुग्णसंख्या आटोक्यात आणा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला आदेश

बीडमध्ये 3 अतिदक्षता वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. एकूण 17 वॉर्ड सज्ज आहेत, प्रत्येक वॉर्डासाठी उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना रोज 25 पी पी इ  किट लागणार आहेत.रुग्णासाठी लागणाऱ्या औषधाचा मुबलक साठा करण्यात आला आहे,

संकटात संधी शोधली
बीडच्या जिल्हा रुग्णालयाची इमारत 40 वर्षांपूर्वीची आहे. मोठी अवकळा या इमारतीची निर्माण झाली होती. कोव्हिडं 19 च्या पार्शवभूमीवर जिल्हा रुग्णालयाचा चेहरा मोहरा बदलला आहे. अवघ्या महिनाभरात बीडचे जिल्हारुग्णालय अद्यावत केले आहे. कोरोनाच्या या संकटात जिल्हारुग्णालयात मोठा बदल घडवत एक संधी निर्माण केली आहे.