चांगल्या कामगिरीबद्दल लष्कराकडून पुणे पोलिसांची कृतज्ञता व्यक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pune-police

कोरोनाच्या कालावधीत पुणे पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल हिंदुस्थानी लष्कराकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. पोलीस आयुक्त कार्यालय मेजर जनरल जी ओ सी दक्षिण महाराष्ट्रचे नवनीत कुमार, आणि गोवा सब एरिया अनुप बारबरे, कर्नल जी एस दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा सब एरिया यांनी पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, सहपोलिस आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे पोलीस, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे ,पोलीस उप-आयुक्त विरेंद्र मिश्र, पोलीस उप-आयुक्त बच्चन सिंग , महादेव पाटील हजर होते या वेळी केक कापून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर पुणे पोलीस रात्रंदिवस काम करीत आहेत. नाकाबंदी, अवैद्य धंद्यावर छापा, कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी बहुतांश पोलीस ठाण्यातील कर्मचारी झोकून देऊन काम करीत आहेत. पुणे पोलिसांच्या चांगल्या कामगिरीमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे भारतीय लष्कराचे अधिकारी नवनीत कुमार यांनी पोलिसांचे आभार मानले. अशाच प्रकारे पुणे शहरातील इतर सहायक पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन लष्कराच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांचे कामाबाबत कृतज्ञता व्यक्त केली आहे.