
कोल्हापूरमध्ये बुधवारी सकाळपर्यंत कोरोना पॉझीटिव्ह एकच रुग्ण आढळल्याने, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 726 झाली होती. आतापर्यंत 651 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आजपर्यंत 8 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाल्याने, सध्या 67 कोरोना पॉझीटिव्ह रुग्णांवर सीपीआर मध्ये कोरोना कक्षात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडुन मिळाली.





























































