पुणे – लॉकडाउनमध्ये दारुविक्री भोवली, 23 जणांवर गुन्हा दाखल; तब्बल 1100 लीटर दारु जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाउन कालावधीत शहरातील विविध भागात दारुविक्री करणाऱ्या 23 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करुन 1100 लीटर दारुसाठा जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेने विविध शहरात ठिकाणी छापा टाकून कारवाई केली.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात 14 जुलैपासून लॉकडाउन करण्यात आले आहे. मात्र, लॉकडाउनचा गैरफायदा घेऊन जादा पैसे कमविण्याच्या उद्देशाने भारती विद्यापीठ, वारजे माळवाडी, विमानतळ, खडकी, येरवडा, मुंढवा, बिबवेवाडी, वानवडी, हडपसर, सहकानगर, सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत देशी-विदेशी दारुविक्री करण्यात येत होती. पोलिंसानी दारुविक्री करणाऱ्या 23 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन 1 लाख 76 हजारांचा देशी विदेशी दारुसाठा जप्त करण्यात आला. ही कामगिरी पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनी केली.