भय इथले संपत नाही, यूपीच्या गोंडात पुजाऱयावर जीवघेणा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात गुन्हेगारांना कायद्याचे भयच उरलेले नसल्याची प्रचिती शनिवारी रात्री घडलेल्या यूपीच्या गोंडातील पुजाऱयावरील जीवघेण्या हल्ल्याने पुन्हा आली आहे. राजस्थानातील करौलीच्या पुजारी जळीतकांडापाठोपाठ यूपीच्या गोंडा जिल्ह्यात जमिनीच्या वादातून अज्ञात मारेकऱयांनी राम जानकी मंदिराचे पुजारी सम्राट दास यांना मध्यरात्री गोळ्या घातल्या. रक्ताने माखलेल्या दास यांना यांना उपचारासाठी लखनौ येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. आधीच जंगलराज म्हणून संबोधल्या जाणाऱया यूपीतील या भूमाफियांच्या हल्ल्याने योगी आदित्यनाथ सरकारच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत.या हल्लाप्रकरणात चार मारेकऱयांचा हात असून त्यापैकी 2 संशयितांना गोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गोंडा जिल्ह्यातील इतिया ठोक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिर्रे मनोरमा गावातील  राम जानकी मंदिराचे पुजारी  अतुल बाबा उर्फ  सम्राट दास हे मंदिरात झोपलेले असताना शनिवारी रात्री 2 वाजता चार अज्ञात मारेकऱयांनी त्यांच्यावर पिस्तुलांनी अंदाधुंद गोळीबार केला.या हल्ल्यात अतुलबाबा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर लखनौच्या रुग्णालयात आयसीयूत उपचार सुरु आहेत.

या पुजाऱयाकर जमिनीच्या वादातून गेल्या वर्षीही असाच जीवघेणा हल्ला झाला होता असे पोलिसांनी सांगितले.पुजारी सम्राट दास यांच्यात नदीकाठच्या महागडय़ा जमिनीच्या मालकीवरून यूपीतील भूम़ाफीयांशी वाद आहे. या वादातूनच बाबांवर जीवघेणा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. मात्र हाथरस  गँगरेप प्रकरणावरून आधीच यूपीतील वातावरण पेटलेले असताना हि दुसरी गुन्हेगारी घटना घडल्याने विरोधकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारचे कायदा सुव्यवस्थेकर नियंत्रण नसल्याचा हल्लाबोल चढवला आहे.

दोन संशयितांना अटक

गोंडा कोतवाली ठाण्याचे कोतवाल संदीपकुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार पुजारी सम्राट दास यांच्यावरील हल्ला हा भूमाफियांनीच जमिनीच्या वादातून घडवून आणला आहे. नदीकाठच्या 200 बिघे जमिनीच्या मालकीवरून भूमाफियांचा सम्राट दास यांच्याशी फार जुना वाद सुरु आहे. या हल्ल्यात चार मारेकरी सहभागी  होते. त्यातील 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंदिराचे दुसरे पुजारी सीताराम दास यांच्या तक्रारीकरून अज्ञात मारेकऱयांविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. मात्र राजस्थानच्या करौलीतील पुजारी जळीतकांडपाठोपाठ यूपीत मंदिराच्या पुजाऱयावर मारेकऱयांनी जीवघेणा हल्ला केल्याने देशातील कायदा सुव्यवस्थेबाबत हिंदू संत आणि साधू समाजात तीव्र संतापाचे वातावरण आहे. गंभीर गुन्हे करून आपली दहशत पसरवणाऱया गुन्हेगारांना जरब असेल असे कायदे करा अशी मागणी संत समाजाने केली आहे. याआधी राजस्थानच्या करौली गावात जमिनीच्या वादातूनच मंदिराच्या पुजाऱयाला जिवंत जाळण्यात आले होते.त्या गुन्ह्याची आग शमली नाही तोच पुन्हा मंदिराच्या पुजाऱयाकर जीवघेणा हल्ला घडल्याने हिंदू समाज संतप्त आहे.