
एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची फसवणूक करण्यात आल्याची घटना लातूरच्या अहमदपूरमध्ये घडली आहे. पैसे काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला मदतीची बतावणी करत त्याचे एटीएम कार्ड आणि पिन नंबर घेतले. त्यानंतर त्यांच्या खात्यातील तब्बल 66 हजार 996 रुपयांची रक्कम उडवण्यात आली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी दत्तात्रय रामचंद्र रामगिरे (रा. येलमवाडी ता.मोहोळ जि.सोलापूर) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, तक्रारदार अहमदपूर येथील थोडगा रोडवरील एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका व्यक्तीने मदत करण्याची बतावणी करत त्यांचे एटीएम आणि पिन नंबर घेतला. त्यानंतर त्यांच्या खात्यामधील 66 हजार 996 रुपये काढून घेत फसवणूक केली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.



























































