Bihar exit poll – नितीश कुमारांना मोठा धक्का, वाचा निकालाआधीचे अंदाज एका क्लिकवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहार विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. तिसऱ्या टप्प्यात 78 जागांसाठी एकूण 54.57 टक्के मतदान झाले. यानंतर विविध संस्थांनी केलेल्या सर्व्हेनुसार निकालापूर्वीचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यानुसार विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांना मोठा धक्का बसणार असल्याचे दिसते.

बिहारमध्ये एकूण तीन टप्प्यात निवडणूक पार पडली. एकूण 243 विधानसभा जागांसाठी 28 ऑक्टोबरला सर्वात आधी मतदान झाले, त्यानंतर 3 नोव्हेंबरला दुसरा टप्पा आणि 7 नोव्हेंबरला तिसरा टप्पा पार पडला. पहिल्या टप्प्यात 55.69 टक्के, दुसऱ्या टप्प्यात 55.70 टक्के आणि तिसऱ्या टप्प्यात 54.57 टक्के मतदान झाले. 10 नोव्हेंबरला मतमोजणी होणार असून तत्पूर्वी निकालाचे अंदाज व्यक्त होऊ लागले आहेत.

1. ‘रिपब्लिक भारत-जन की बात’ने केलेल्या सर्व्हेनुसार महाआघाडीला 118 ते 138 जागा मिळतील, तर एनडीएला 91 ते 117 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. एलजेपीच्या खात्यात 5 ते 8 जागा आणि अन्य 3 ते 6 जागा असतील असा अंदाज वर्तवण्यात आप आहे.

2. एबीपी न्यूज- C Voter च्या सर्व्हेमध्ये एनडीएला 104 ते 128 जागा आणि महाआघाडीला 108 ते 131 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. एलजेपीला 1 ते 3 आणि अन्यच्या खात्यात 4 ते 8 जागा जातील.

3. टाइम्स नाऊ-C Voter च्या सर्व्हेत कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. एनडीएला 116 तर महाआघाडीला 120 जागा मिळतील असा अंदाज आहे, तर एलजेपीला 1 आणि अन्यला 6 जागा मिळतील.

बिहार विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल पाहता कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे दिसते. यामुळे त्रिशंकू स्थिती निर्माण होईल. एलजेपीमुळे जदयूला जवळपास 25 जागांवर नुकसान होण्याचा अंदाज आहे.