बीडचे एलआयसी ऑफिस जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड येथे सोमवारी पहाटे दोन अडीचच्या सुमारास नगर रोडवर असलेल्या एलआयसी ऑफिसला भीषण आग लागली. अवघ्या काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले.

या आगीत संपूर्ण ऑफिस जळून खाक झाले. काहीही शिल्लक राहिले नसून सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. बीडचे एलआयसी ऑफिस नगर रोडवर आहे.

रविवारची सुट्टी असल्यामुळे ऑफिस बंद होते. सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास ऑफिसला अचानक आग लागली. आगीचे लोळ बाहेर पडत होते.

काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले, या आगीत संपूर्ण ऑफिस जाळून खाक झाले माहिती मिळताच एलआयसीच्या वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्याने घटनास्थळी धाव घेतली.

आग विझवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. आगीत संपूर्ण रेकॉर्ड, कागदपत्र, कॉम्प्युटर, नोंदी, फर्निचर सर्व काही जळून खाक झाले. सर्व साहित्याचा अक्षरशः कोळसा झाला. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.