नाशिकमध्ये दोन तरुणांचा बुडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
drowned

जिल्ह्यातील उमराणे व अस्तगाव येथे शुक्रवारी विहिरीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला. देवळा तालुक्यातील उमराणे येथील तुषार देवरे (23) हा कांद्यावर फवारणी करण्यासाठी शेतात गेला होता. त्या वेळी बादलीने पाणी काढण्याच्या प्रयत्नात तो विहिरीत पडला. त्याला देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱयांनी तपासून मृत घोषित केले.

दुसरी घटना नांदगाव तालुक्यातील अस्तगाव येथे घडली. सचिन काजीकर (27) हा शेतातील विहिरीत पाय घसरून पडला. रावसाहेब बबन काजीकर यांनी ही माहिती मनमाड पोलिसांना दिली.