
जे लोक सारखं सरकार पडणार म्हणतात ते ऐकताना मला गंमत वाटते. जी भांडी मोकळी असतात ती फार वाजतात. भरलेलं भांडं कधी आवाज करत नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.
आयुष्यभर सत्तेत राहण्यासाठी कोणी आलेले नाही. आज आम्ही आहोत कधी तरी त्यांचे येईल, पण ते लवकर येणार नाहीत. लोपं सारखं म्हणतात की हे सरकार पडणार. हे ऐकताना मला गंमत वाटते. मोकळी भांडी फार वाजतात. त्यामुळे त्यांनी करायचा तितका आवाज करावा, सरकार पडलं तर बघू काय करायच ते असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने बोलताना सुप्रिया सुळे यांनी भाजपकडून सुरू असलेल्या अपप्रचाराचा चांगलाच समाचार घेतला. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष होणार आणि देशाचे पंतप्रधान आपल्या जिह्यात होणार काम पाहण्यासाठी येतायत याच्यापेक्षा काय मोठे यश आपल्या सरकारचे असेल? पंतप्रधान वेगळ्या विचाराचे असले तरी त्यांना पुणे हवेहवेसे वाटतेय, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.































































