पाकिस्तानच्या दहा खेळाडूंना कोरोनाची लागण, न्य़ूझीलंडने सरावापासून रोखले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना वारंवार नियम तोडल्याचा फटका बसला. न्यूझीलंडच्या दौऱयावर असलेल्या पाकिस्तानच्या दहा खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. न्यूझीलंडच्या आरोग्य विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना सरावापासून रोखले आहे.

पाकिस्तानचा क्रिकेट संघ 23 नोव्हेंबरला न्यूझीलंडमध्ये पोहोचला, पण टप्प्याटप्प्याने कोरोनाची लागण झालेल्या पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे न्यूझीलंडच्या आरोग्य मंत्रालयाकडून कठोर पाऊल उचलण्यात आले. आता पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना 14 दिवसांच्या विलगीकरणात राहावे लागणार आहे. तसेच पाकिस्तानच्या आणखी खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी कडक नियमांचा अवलंब करण्यात आला आहे. दरम्यान, न्यूझीलंड व पाकिस्तान यांच्यामध्ये दोन कसोटी व तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळविण्यात येणार आहे. दोन देशांमधील मालिकेला 18 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.