ब्रिटिशकालीन फायर हायड्रंट होणार पुनरुज्जीवित, युवासेनेच्या मागणीला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिटिशकालीन फायर हायड्रंट सध्या बंदावस्थेत असल्यामुळे मुंबईतील आगी विझवण्यास जवान, अधिका-यांना मोठय़ा शर्थीने प्रयत्न करावे लागतात. परंतू युवासेनेच्या पाठपुराव्यामुळे आता ब्रिटिशकालीन हायड्रंट लवकरच पुनरूज्जीवीत होणार असून शहरातील आगीचे प्रमाण आटोक्यात येण्यास मदत होणार आहे.

ब्रिटिश काळापासूनच शहरात आग लागल्यानंतर तत्काळ पाणी भरण्यासाठी फायर हायड्रंट पॉईंट नाक्यानाक्यावर आणि गल्लोगल्ली बसवण्यात आले होते. काहीवेळा आगीच्या घटना घडल्यानंतर अग्निशामक दलाच्या गाडीतील पाणी संपल्यामुळे पाणी भरण्यासाठी दूरवर जावे लागते. त्यामुळे फायर हायड्रंट पुन्हा सुरू करण्यात यावे, अशी मागणी वरळीचे युवासेना उपविभाग अधिकारी अभिजीत पाटील यांनी प्रमुख अभियंता जलकामे अ.सु.राठोर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यावर मुंबईमधील फायर हायड्रंट पॉईंटची अधिकाऱयांकडून पाहणी करून ते लवकरच दुरुस्त केले जातील, असे आश्वासन अधिकारुयांनी दिल्याचे अभिजीत पाटील यांनी सांगितले.