
>> सतीश ना. गोगटे
सद्यपरिस्थितीमध्ये हवामानात अतिशय बदल होताना दिसत आहे. डिसेंबरपर्यंत थंड वातावरण झालेले दिसत नाही. हिवाळा थोडा पुढे सरकला आहे. हे सर्व ग्लोबलायझेशनचे प्रतीक आहे. त्यामुळे पक्ष्यांचे स्थलांतरही प्रभावित झालेले आढळते. परंतु पक्षी व प्राणी, निसर्गामध्ये होणाऱया बदलांना सामोरे जाताना दिसतात व बदल स्वीकारताना. मानवाच्या बाबतीत हे होताना दिसत नाही व निसर्गात होणाऱया बदलांना प्रभावीपणे, तोंड देताना दिसत नाही. आपण सर्वांनी स्थलांतरित पक्षी, पशूंपासून हे शिकायला पाहिजे.
आजकाल पक्षीनिरीक्षण करताना बरेच पक्षीप्रेमी, अभ्यास करणाऱया संस्था, आंतरराज्यीय तसेच आंतरराष्ट्रीय संस्था, संशोधक आपणास दिसतात. विविध भौगोलिक प्रदेश, विविध पाणथळ व गवताळ अभयारण्ये विविध देश तसेच वर्षभरामधील विविध कालखंडात विविध ऋतूंमध्ये हे अभ्यासक आपली नोंद करून ठेवतात व एकमेकांना शेअर (Sharing) करताना पण दिसतात. या निरीक्षणामध्ये सर्वात जास्त औत्सुक्य पक्ष्यांच्या स्थलांतरणाला जाते. आजपर्यंत खूप पक्षीमित्र, पक्षी संशोधकांनी यावर अभ्यास केला आहे, पण तरीही अजूनपणे पक्ष्यांचे स्थानांतर कधी व कशासाठी व कसे होते यामध्ये मतभिन्नता आहे.
मी स्वतः गेली 12 वर्षे नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य परिसराचा अभ्यास करत आहे. यादरम्यान मला स्वतःला पक्षी स्थलांतराच्या खूप नोंदी नोंदवता आल्या त्या मी येथे मांडत आहे.
सर्वप्रथम आपण ‘पक्षी स्थलांतर’ कशासाठी? हे समजून घेऊ. आपणास ठाऊक आहे की, पृथ्वीवर ऋतुमान बदल हा सतत घडत असतो व सूर्याच्या उत्तरायण व दक्षिणायणामुळे वातावरणात सतत बदल घडत असतो. पुठलाही प्राणी किंवा पक्षी यांना जगण्यासाठी अन्न, पाणी यांची गरज असते. मानवाप्रमाणे अन्न व पाणी यांची साठवणूक करून प्रतिकूल कालखंडात त्याचा वापर करण्याची कला प्राणी व पक्षी यामध्ये नाह‘ाr. पक्ष्यांना उडता येत असल्याने ते प्रतिकूल कालखंडात दुसऱया अनुकूल भागात उडत जातात. यालाच ‘पक्षी स्थलांतर’ असे आपण म्हणतो. अर्थातच अन्नाच्या शोधात जातात हे निर्विवाद आहे. सर्व पक्षी स्थलांतर करतात का? उत्तर नाही, असे आहे. काही प्राणी व पक्षी आपला भूभाग कधीही सोडत नाहीत किंवा समान भूभागामध्ये स्थलांतर करतात त्यास आपण (Local Migration) स्थानिक स्थलांतर असे म्हणतो.
नांदूरमध्यमेश्वर येथे पक्षी प्रामुख्याने हिवाळ्यात स्थलांतर करताना दिसतात. साधारणपणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ स्थलांतरित पक्ष्यांचा आपणास दिसतो. याच कालखंडात हिमालय, सैबेरिया, युरोप यांसारख्या प्रदेशांमध्ये बर्फवृष्टी होते व पक्ष्यांना अन्न मिळत नाही, म्हणून प्रामुख्याने पक्षी इकडे येताना दिसतात. या उत्तरेकडील भागातील सरोवरे, नद्या या कालखंडात गोठून जातात व त्यातून अन्न मिळवणे कठीण जाते. त्यामुळे पाणथळ भागातील पक्षी येथे येताना जास्त दिसतात. त्याच प्रमाणे त्यांच्यावर उपजीविका करणारे शिकरी पक्षीही आपणास स्थलांतर करताना दिसतात.
आपण पक्ष्यांचे स्थलांतर कशासाठी व आपल्या भागात (महाराष्ट्र) स्थलांतर कधी होते ते पाहिले. आता स्थलांतर कसे होते ते पाहूया. आपण आपल्या मार्गक्रमणाकरिता जसा मार्ग निवडतो. हायवे रोड निवडतो, साधारणपणे त्याच धर्तीवर पक्षीपण आपले मार्ग निवडतात. यामध्ये पक्षी संशोधकांनी भरपूर अभ्यास करून हे शोधून काढले की, पक्षी स्थलांतर करतानासुद्धा काही विशिष्ट मार्ग निवडतात. यांना फ्लायवे (Flyway) असे संबोधले जाते. आपल्या हिंदुस्थनातून जाणारे Flyway शेजारी दाखविलेल्या चित्रात दिसत आहेत. आपले परमभाग्य आहे की, ‘नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य’ सेंट्रल एशियन फ्लायवेवर आहे. त्यामुळे येथे विविध पक्षी येताना व जाताना आढळतात.
हिंदुस्थानी उपखंडातून तीन बर्ड फ्लायवेज जातात. 1) सेंट्रल एशियन फ्लायवे 2) वेस्ट एशियन, ईस्ट एशियन फ्लायवे आणि 3) ईस्ट एशियन ऑस्ट्रेलियन फ्लायवे. महाराष्ट्रात प्रथम ‘रामसर’ मानांकित असलेले नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य हे सेंट्रल एशियन फ्लायवे आहे. त्यामुळे येथे स्थलांतरित पक्ष्यांचे वैशिष्ट खूप जास्त प्रमाणात आहे. साधारणपणे 70 ते 80 प्रकारचे पक्षी येथे स्थलांतरित असण्याची नोंद आहे. हे प्रमाण एकूण पक्षी आढळणाच्या जवळजवळ 39 टक्के आहे. म्हणूनच नांदूरमध्यमेश्वर या अभयारण्यास पै. सलिम अलींनी महाराष्ट्राचे भरतपूर असे संबोधले आहे. नांदूरमध्यमेश्वर हे ठिकाण बदक पुळातील anatidae पक्ष्यांसाठी नंदनवन आहे. यासाठी त्यांना लागणारे Habitat उपलब्ध आहे. काही खेळ, तर काही ठिकाणी पाणी फुगवठा उथळ आहे त्यामुळे त्यांना खाद्य भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच रात्रीच्या वेळी बदकांना तलावाच्या किनाऱयावरचा आसरा लागतो. त्यासाठीचे बरेच ‘Hides’ पण येथे उपलब्ध आहेत.
पक्षी Flyway’s ची निवड का करताता? कारण त्या विशिष्ट मार्गांनी प्रवास करताना हवेचा झोत त्यांच्या उडण्यासाठी अनुकूल असतो व उडताना त्यांची कमी प्रमाणात दमछाक होते. तसेच बरेच पक्षी एकूण थव्यांनी उडत असल्याने पक्ष्यांची चुकामूक होत नाही. मी असे बरेच पक्षी बघितले आहेत की त्यांची थव्यामधून चुकामूक झाल्याने किंवा जखमी झाल्याने त्यांनी या प्रदेशातच संपूर्ण वर्षभर काढले आहे व पुढच्या वर्षी ते त्यांच्या थव्यांना जाऊन भेटले आहेत. पाच वर्षांपूर्वी रशियामधून येणारा पांढरा करकोचाची (Whi Storke) जोडी अशीच वर्षभर नांदूरमध्यमेश्वर येथे राहिल्याची माझी नोंद आहे.
पक्ष्यांच्या काही प्रमुख प्रजाती ज्या सेंट्रल एशियन फ्लायवेने महाराष्ट्रामध्ये येतात. त्या अशाः पट्टकादंब (बार हेडेड गूज) शामकादंण (ग्रे लॅग गूज) चक्रवाक (ब्राह्मणी शेलडक), कॉमन शेलडक,थापटचा (नॉर्दन शॉव्हेलर), थुवई बदक(गारगजी), तलवार बदक (पिनटेल), गढवाल बदक, शेंडी बदक, चिमणशेंडय़ा (कॉमन पोचार्ड) नयनसरी, चक्रांग (युरेशियन हिल), (मोठी लालसरी बदक (रेड ब्रेस्टेड पोचार्ड), युरेशियन दलदल ससाणा, कॉमन व्रेन, डेमॉझॉल व्रेन, मछली घार (ऑप्रे), ग्रेटर फ्लेमिंगो, चिगबलाक (पेंटेड स्टॉर्प), उघडय़ा चोचीचा बलाक (ओपन बील स्टॉर्प) यासारखे बरेच पाणथळ प्रकारचे पक्षी नांदूरमध्यमेश्वर येथे येताना दिसतात.
सद्यपरिस्थितीमध्ये हवामानात अतिशय बदल होताना दिसत आहे. डिसेंबरपर्यंत थंड वातावरण झालेले दिसत नाही. हिवाळा थोडा पुढे सरकला आहे. हे सर्व ग्लोबलायझेशनचे प्रतीक आहे. त्यामुळे पक्ष्यांचे स्थलांतरही प्रभावित झालेले आढळते. परंतु पक्षी व प्राणी, निसर्गामध्ये होणाऱया बदलांना सामोरे जाताना दिसतात व बदल स्वीकारताना. मानवाच्या बाबतीत हे होताना दिसत नाही व निसर्गात होणाऱया बदलांना प्रभावीपणे, तोंड देताना दिसत नाही. आपण सर्वांनी स्थलांतरित पक्षी, पशूंपासून हे शिकायला पाहिजे.



























































