पीएमपीएल बसप्रवासात तरूणाच्या खिशातील 50 हजारांची रोकड चोरीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

पीएमपीएल बसप्रवासात प्रवाशांकडीत ऐवज लांबविण्याचे सत्र सुरूच असल्याचे दिसून आले आहे. पद्मावती ते स्वारगेट मार्गावरील बसमधून प्रवास करणाऱ्या तरूणाच्या खिशातील 50 हजारांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली आहे. याप्रकरणी संतोष टोमके (वय – 30,रा. संतोषनगर, कात्रज) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संतोष काल दुपारी तीनच्या सुमारास पीएमपीएल बसने पद्मावती येथून स्वारगेट प्रवास करत होते. त्यावेळी बसमध्ये गर्दी असतान चोरट्यांनी त्यांच्या खिशातील 50 हजारांची रोकड चोरली. संतोष स्वारगेट स्थानक परिसरात उतरले असता, त्यांच्या खिशातील रोकड चोरीला गेल्याचे दिसून आले.

मागील महिनाभरापासून पीएमपीएल बसेसमध्ये चोरीचे सत्र सुरू असताना पोलिस ढिम्म असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. चोरट्यांकडून बसेसमध्ये ज्येष्ठ महिलांच्या हातातील बांगड्या कटरच्या सहाय्याने कापून नेण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत.