33 वर्षे केवळ चहावर जगतायत पल्लीदेवी! ‘चायवाली चाची’ला पाहून डॉक्टरही हैराण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चहा हे अनेकांचे आवडते पेय आहे. सकाळची सुरुवात अनेकांची वाफाळलेल्या चहाने होते. अगदी थकवा जाणवला तरी आपण एनर्जीसाठी चहा पितो. मात्र एखादी व्यक्ती गेली 33 वर्षे केवळ चहावर जगतेय, असं तुम्हाला कुणी सांगितलं तर सुरुवातीला त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरंय.

छत्तीसगडमधील कोरिया जिह्यातील बदरिया गावच्या 44 वर्षीय पल्ली देवी या गेली 33 वर्षे केवळ चहावरच जगतायत. इतक्या वर्षांत अन्नाचा एक कणही त्यांच्या पोटात गेलेला नाही. त्यांच्या याच सवयीमुळे ’चायवाली चाची’ म्हणून त्या आजूबाजूच्या परिसरात लोकप्रिय आहे. इतकी वर्षे फक्त चहा पिऊनदेखील त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याने डॉक्टरांनी देखील आश्चर्य व्यक्त केले आहे. आपल्याला कधीच भूक लागत नाही, दिवस मावळल्याकर आपण काळा चहा पित असल्याचे पल्लीदेवीने सांगितले.

सहावीत असताना अन्नत्याग

सहावीत असल्यापासून पल्लीदेवी यांनी जेवण सोडले आहे, असे त्यांच्या वडिलांनी म्हणजेच रतिराम यांनी सांगितले आहे. मला समजायला लागले तेव्हापासून मी ताईला जेवताना कधीच पाहिले नाही असे त्यांच्या छोटय़ा भावाने सांगितले आहे.

एका हट्टामुळे सोडले जेवण

पल्लीदेवी यांनी जेवण सोडण्यामागे देखील एक गंमतीदार कथा आहे. घरामध्ये ज्या ठिकाणाहून दुध यायचे त्या दुधविक्रेत्याला पैसे द्यायला उशीर झाल्यानंतर त्याने कुटुंबीयांना खूप सुनावले होते. त्यामुळे नाराज झालेली आपली बहिण तेव्हापासून फक्त काळा चहा पिऊ लागल्याची माहिती त्यांचा भाऊ बिहारी लाल याने दिली आहे.