कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून, यशवंत मनोहर यांनी नाकारला ‘जीवनव्रती’ पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून सुप्रसिद्ध कवी आणि समीक्षक यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्य संघाचा ‘जीवनक्रती’ पुरस्कार नाकारला.

तुम्ही कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवणारच असं कळलं. मराठी साहित्यातील माझी प्रखर इहबुद्धिवादी प्रतिमा लक्षात घेऊन आपण अशा दुरुस्त्या कराल असं वाटलं होतं. पण ते झालं नाही. म्हणून मी नम्रपणे हा पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे, असे पत्र मनोहर यांनी साहित्य संघाला पाठवले आहे.

स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांना शिक्षणबंदी आणि ज्ञानबंदी करणाऱया शोषणसत्ताकाची प्रतीकं मी पूर्णतः नाकारलीच आहेत. माझा सन्मान म्हणजे जिच्या अनन्यतेमुळे मी ओळखला जातो त्या माझ्या जीवनदृष्टीचा सन्मान! माझ्या या जीवनदृष्टीत न बसणारे अनेक पुरस्कार मी नाकारले आहेत.

वाङ्मयीन कार्यक्रमात धर्म येणं मला अजिबात मान्य नाही. म्हणून आपण मला दिलेला ‘जीवनव्रती’ हा पुरस्कार मी नम्रपणे नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. आयुष्यभर जपले ते मी कोणत्याही कारणास्तव नाकारू शकत नाही. कारण मी मला नाकारलं तर माझ्याशी जगण्यासारखं काहीही नाही. क्षमस्व, असे मनोहर यांनी म्हटले आहे.