
मराठी चित्रपटसृष्टीतील जबरदस्त जोडी मिताली मयेकर व सिद्धार्थ चांदेकर हे नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. लग्नानंतर हनीमूनसाठी या दोघांनी कोणतेही देशाबाहेरचे ठिकाण न निवडता चक्क ते लोणावळ्याला गेले होते. लोणावळ्यातील मचान या रिसॉर्टवर हे दोघे थांबले होते. तेथील त्यांचे रोमॅण्टिक फोटोही त्यांनी शेअर केले आहेत.
मिताली व सिद्धार्थने त्यांचा किस करतानाचा फोटो शेअर केला आहे. सोबतच मितालीने तिचा बाथटबमधील टॉपलेस फोटो देखील शेअर केला आहे. त्यांच्या या फोटोंना त्यांच्या सहकलाकारांनी तसेच चाहत्यांनी भरपूर लाईक्स दिले आहेत.
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर हे दोघे रविवार 24 जानेवारी रोजी धुमधडाक्यात विवाहबद्ध झाले आहेत. गेल्या महिन्याभरापासून या लग्नाची चर्चा सुरू होती. या लग्नापूर्वी अनेक कलाकारांनी त्यांना केळवणाची निमंत्रणं दिली होती. त्याचे फोटोही व्हायरल झाले होते.
























































