IPL2021 अर्जुन तेंडुलकरची आयपीएलमध्ये ‘एन्ट्री’, मुंबई इंडियन्सकडून खेळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याची आयपीएलमध्ये एन्ट्री झाली आहे. आयपीएल लिलावात पहिल्यांदाच सहभागी झालेला अर्जुन तेंडुलकर यंदा मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. मुंबईच्या संघाने त्याला 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजला आपल्या संघात घेतले.

मुंबई इंडियन्सच्या संघात अर्जुन तेंडुलकर हा अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत दिसेल. वेगवान गोलंदाजी आणि विस्फोटक फलंदाजी ही त्याची खासियत आहे. अर्थात बडे बडे खेळाडू असलेल्या मुंबईकडून त्याला किती सामने खेळायला मिळतील हा प्रश्न आहे, परंतु मिळालेल्या संधीचे सोने करताना तो नक्की दिसेल.

IPL2021 – कानामागून आला अन… ‘या’ वेगवान गोलंदाजासाठी लागली 14 कोटींची बोली

लिलावाआधी विस्फोटक खेळी

चेन्नईत झालेल्या आयपीएलच्या लिलावाआधी अर्जुन तेंडुलकर याने आपल्या बॅटची ताकद दाखवून दिली. 73 व्या पोलीस निमंत्रण शिल्ड क्रिकेट स्पर्धेत (Police Invitation Shield Cricket Tournament 2020-2021) अर्जुनने फक्त 31 बॉलमध्ये नाबाद 77 रनची खेळी केली. तसेच 41 धावा देत तीन बळीहे घेतले. त्याच्या या दमदार कामगिरीच्या जोरावर एमआयजी क्रिकेट क्लबने इस्लाम जिमखानाचा 194 धावांनी मोठा पराभव केला.

IPL2021 – पंजाबने तब्बल 25 पट अधिक बोली लावलेला शाहरूख खान कोण आहे?