
एखाद्या मुद्यावर टीव्हीवर, न्यूज चॅनलवर दोन नेत्यांत शाब्दिक चकमकी झालेल्या तुम्ही पाहिल्या असतील. पण आंध्र प्रदेशात एका लाईव्ह कार्यक्रमात भाजप नेत्यावर चप्पल भिरकावण्यात आल्याची घटना समोर आलीय. आंध्र प्रदेशच्या एका तेलुगू न्यूज चॅनलवर सुरू असलेल्या लाईव्ह कार्यक्रमा दरम्यान ही घटना घडली. आंध्र प्रदेशच्या राजधानीत जगन सरकारने तीन राजधान्यांचा प्रस्ताव मांडल्यानंतर अमरावतीमध्ये काम बंद करण्यात आले. राजधानीसाठी जवळपास गेल्या 434 दिवसांपासून शेतकरी आणि महिला विरोध प्रदर्शन करत आहेत. याच विषयावर एका चॅनलवर लाईव्ह चर्चा सुरू होती. या कार्यक्रमात अमरावती विभाग समिती संयुक्त कृती समिती (जेएसी) अध्यक्ष डॉ. कोलिकापुडी श्रीनिवास राव, भाजपचे राज्य महासचिव विष्णुवर्धन रेड्डी आणि इतर सहभागी झाले होते.



























































