
रस्त्यावर सुरू असलेले भांडण सोडविण्यासासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडत मारहाण केल्याची घटना हडपसर परिसरात घडली आहे. याप्रकरणी ओमकार उर्फ बंटी काकडे आणि अश्विन उर्फ भाऊ पडघमकर यांच्याविरूद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई रवी राठोड यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री अकरा वाजता फिर्यादी रवी ड्युटी संपल्यानंतर घरी जात होते. त्यावेळी एका दारू दुकानाजवळ तिघेजण एकासोबत भांडण करीत होते. दुकान बंद झालेले असतानाही आरोपी दुकानाला दारू देण्यावरून वाद घालत होते. त्यामुळे रवीने त्यांना चुकीचे करताय असे समजून सांगितले. त्याचा राग आल्यामुळे आरोपी ओमकार काकडे याने त्यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यानंतर रवीच्या डोक्यात बियरची बाटली फोडून त्यांना जखमी केले. हडपसर पोलीस तपास करत आहेत.




























































