मिस्त्रींना झटका; टाटांना दिलासा, टाटा सन्सच्या चेअरमनपदावरून हकालपट्टी योग्यच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी उद्योजक रतन टाटांना दिलासा देत सायरस मिस्त्रीना मोठा झटका दिला. सायरस मिस्त्रीची टाटा सन्सच्या चेअरमनपदावरून केलेली हकालपट्टी योग्यच आहे, असा निकाल सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना व न्यायमूर्ती व्ही. रामासुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने दिला.

सायरस मिस्त्री आणि टाटा सन्स यांच्यात मागील तीन वर्षांपासून न्यायालयीन लढा सुरू आहे. या प्रकरणात राष्ट्रीय पंपनी विधी अपिलीय न्यायाधिकरणाने मिस्त्रीची टाटा सन्सच्या चेअरमनपदी पुन्हा नियुक्ती करण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशाला रतन टाटांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.