
राज्यासह पुणे जिल्हा व शिरूर तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने दिलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक नियम, सूचना व उपाययोजनांचे तंतोतंत पालन करा, अन्यथा पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्याचा इशारा शिरूरचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिला आहे.
तसेच शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले असून मध्यरात्रीपासून शासनाने कोविड-19 विषयक जे निर्बंध घातले आहेत त्या आदेशाचे बारकाईने वाचन करावे व दिलेल्या सूचनांचे तालुक्यातील नागरिकांनी पालन करावे अन्यथा सदर आदेशाचे उल्लंघन करण्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा ही खानापुरे यांनी दिला आहे.
सध्या शिरूर तालुक्यात देखील कोरोनाची रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे. कोरोनाची साखळी तुटावी, नागरिकांचे आरोग्य सुक्षित रहावे व कोरोना संसर्गापासून बचाव व्हावा म्हणून शासनाने आता नागरिकांना सूचना जारी केल्या आहेत. त्यात रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत रात्रीची जमावबंदी, 5 पेक्षा अधिक लोक एकत्र आल्याचे निदर्शनास आल्यास प्रत्येकी एक हजार रुपये दंड, रात्री 8 ते सकाळी 7 सर्व सार्वजनिक आस्थापना बंद राहतील तसेच सर्व हॉटेल, मॉल्स, प्रेक्षागृह, दुकाने रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहतील. रात्री 8 नंतर पार्सल सेवेला परवानगी असेल. मास्क न घालणाऱ्यांना आता 500 रुपयांची दंडात्मक कारवाई तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर एका हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत कोविड19चे नियम ना पाळणाऱ्यांना 500 रुपये दंड ठोटविण्यात येणार आहे. विवाहासाठी फक्त 50 जणांनाच परवानगी राहणार असून विवाहास 50 पेक्षा अधिक लोक असल्यास संबधित मालमत्ता कोविडची साथ संपेपर्यंत सीलबंद केली जाईल. कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून आता अंत्यविधीसाठी फक्त 20 जणांना परवानगी असणार आहे. तर शिरूर तालुक्यात सध्या कोणत्याही राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक परवानगी नसल्याचे शिरूर पोलिस स्टेशन पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडून वारंवार देण्यात येणा-या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे तंतोतंत पालन करावे, मास्क लावणे, गर्दी न करणे,वेळोवेळी हात स्वच्छ धुवातेत. शक्यतो घरीच थांबावे असे आवाहन खानापुरे यांनी केले केले असून जेणेकरून आपण, आपले कुटुंब व परिसरातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होईल व कोरोनापासून बचाव होईल असेही ते म्हणाले.
























































