
उत्तराखंडच्या जंगलात अग्नी तांडव सुरू आहे. राज्यातील पौडी, अल्मोडा आणि पिथौरागड जिल्ह्यात आगीचे सर्वाधिक प्रमाण आहे. उत्तराखंडच्या जंगलात आगीच्या 962 घटना घडल्या असून आतापर्यंत 1258 हेक्टरवर ही आग पसरली आहे. गेल्या आठवड्यापासून या आगींच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
सर्वात मोठी आग पौडी जिल्ह्यात लागली आहे. पौडी जिल्ह्यातील 338 हेक्टर जागा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहे. गेल्या वर्षी संपूर्ण राज्यात 172 हेक्टरवर आग लागली होती. पौडी नंतर अल्मोडा आणि पिथौरागड जिल्ह्यात सर्वाधिक आग लागली आहे.
Uttarakhand: Fire control efforts in Uttarkashi, jungles by 35th Battalion @ITBP_official. A fire incident occurred at 1445 hrs today. The Unit controlled spread of fire with joint effort of fire brigade. The situation is under control. No loss of any life or property reported. pic.twitter.com/BLRa4LDXc2
— Prasar Bharati News Services पी.बी.एन.एस. (@PBNS_India) April 3, 2021
उत्तराखंडच्या जंगलात लागलेल्या आगीमुळे आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. तसेच 7 जनावरांचा मृत्यू झाला असून 22 प्राणी जखमी झाले आहेत.
मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी याबाबत चिंता व व्यक्त केली असून गरज पडल्यास हेलिकॉप्टरचा वापर केला जाईल असे म्हटले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आतापर्यंत सरकारने तीस कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. मुख्यमंत्र्याच्या निर्देशानंतर एक कोटी रुपयांची उपकरणे खरेदी केली असून आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत.
#ForestFire
आज 03 अप्रैल 2021 को टिहरी में खाड़ी से आगे 04 किलोमीटर दूर गजा रोड पर ग्राम पाली के सामुदायिक स्वास्थ्य केंद्र के कैंपस के आस पास जंगल में लगी आग जो आवासीय/अनावासीय भवनों की ओर बढ़ रही थी को फायर सर्विस यूनिट ने फायर इंजन से पंपिंग कर आग को पूर्ण रूप से बुझाया।#Fire pic.twitter.com/c0nRAhBELS— Fire Service Uttarakhand Police (@UKFireServices) April 3, 2021




























































