डॉक्टर, वैद्यकीय अधिकाऱयांवरील हल्ल्याच्या 436 तक्रारी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपचारादरम्यान रुग्णांचे काही कमी जास्त झाल्यास नातेवाईकांकडून डॉक्टरांवर, कर्मचाऱयांवर अनेकदा हल्ले होतात. या हल्ल्याप्रकरणी 436 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने आज हायकोर्टात देण्यात आली.

डॉक्टर तसेच वैद्यकीय कर्मचाऱयांवर हल्ल्याच्या घटना महाराष्ट्रात जास्त घडल्या असून आरोग्य अधिकारी व कर्मचाऱयांवरील हिंसाचार रोखण्यासाठी न्यायालयाने यामध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी करत डॉ. राजीव जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी डॉक्टरांवरील हल्ल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आज चिंता व्यक्त केली. आपल्याला डॉक्टरांचे संरक्षण करायलाच हवे, सद्याच्या काळात ते प्रचंड काम करत आहेत, हल्ल्याची ही आकडेवारी पाहता सरकार याबाबत गंभीर नसल्याचे दिसत आहे. असे खंडपीठाने सरकारला सुनावले.