धक्कादायक…रागाच्या भरात अल्पवयीन मुलाने केली वडिलांची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder-knife

अल्पवयीन मुलाने (वय 13) रागाच्या भरात स्वतः च्या वडिलांवर सुरीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना जांभुळवाडी रस्त्यावर सिद्धिविनायक सोसायटीच्या पार्किंगमध्ये घडली आहे. खून झालेल्याचे वय 40 वर्षांचे आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलगा छोट्या बहिणीला मारत होता. त्यामुळे वडिलांनी मुलाला जाब विचारला असता, त्याने वडिलांवर चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आणखी तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे.