Video – बदलापूरमध्ये गॅस गळती, परिसरात धुराचे साम्राज्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बदलापूरमध्ये गुरूवारी रात्री एमआयडीसीमध्ये गॅस गळती झाली. त्यामुळे या भागात राहणार्‍या रहिवाश्यांना श्वास घेण्यास त्रास झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

गुरूवारी रात्री 10.222 वाजता बदलापूर एमआयडीसीमध्ये गॅस गळती झाली. त्यामुळे शिरगाव आणि आपटेवाडी परिरसरातील नागरिकांना याचा त्रास झाला. अनेकांना श्वास घेण्यास त्रास होता तर अनेकांच्या डोळ्यात जळजळ होत होती. या गॅस गळतीमुळे तीन किमी परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. नोबल इंटरमिडिटेस या कंपनीत ही गॅस गळती झाली आहे. अग्निशम दलाला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि ही गॅस गळतीवर नियंत्रण मिळवले.