सारस्वत बँकेचे शैक्षणिक कर्ज कमी व्याजदरात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील सर्वात मोठी नागरी सहकारी बँक असलेली सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक विद्यार्थ्यांना त्यांची कारकीर्द घडवून स्वप्ने साकार करण्यासाठी प्री-अप्रूव्हड् शैक्षणिक कर्ज कमी व्याजदराने देत आहे. वार्षिक 8.50 टक्क्यांनी हे व्याजदर देणार असून त्याचे अनेक अतिरिक्त लाभही विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. कर्ज घेताना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. जो कोर्स असेल त्यासाठी 100 टक्के फी ही कर्ज म्हणून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परकीय चलन खरेदी किंवा फॉरेक्स रेमिटन्सवरील कमिशनवर 25 टक्के सूट तर विद्यार्थिंनींसाठी अर्धा टक्के व्याजदर कमी करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन आणि ऑफलाइन कोर्ससाठीसुद्धा शैक्षणिक कर्ज मिळणार आहे, हे याचे वैशिष्टय़ आहे.