WTC Final टीम इंडियाच्या पराभवानंतर ऑसी कर्णधाराने मागितली माफी, जाणून घ्या कारण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयसीसीच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीत टीम इंडियाला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकाराला लागला. टीम इंडियाने विजयासाठी दिलेले आव्हान न्यूझीलंडने दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत 8 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाच्या या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टिम पेन याने माफी मागितली आहे.

अंतिम लढतीपूर्वी टिम पेन याने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा संघ न्यूझीलंडचा सहज पराभव करेल, असे विधान टिम पेन याने केले होते. परंतु त्याचे हे विधान चुकीचे ठरले आणि न्यूझीलंडने टिम इंडियाचा पराभव करत विजेतेपदाची गदा उंचावली. यानंतर टिम पेन याने माफी मागत कधी-करधी तुम्ही चुकीचेही सिद्ध होतात, असे म्हटले. तसेच त्याने न्यूझीलंडचा संघ आणि कर्णधार केन विलियम्सन यांच्यावरही कौतुकाचा वर्षाव केला. न्यूझीलंडच्या संघाने शानदार क्रिकेट खेळले असेही तो म्हणाला.

‘न्यूजटॉक जडबी’शी बोलताना टिम पेन म्हणाला की, कधी-कधी तुम्ही चुकीचेही सिद्ध होतात. माझा काही किवी प्रेक्षकांशी सामना झाला आणि त्यानंतर मी ऑन एअर येण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने दमदार खेळ केला आणि या संघाचा खेळ पाहणे नेहमीच शानदार असते असेही तो म्हणाला. याआधी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीपूर्वी पेनने हिंदुस्थानने सर्वश्रेष्ठ कामगिरी केल्यास ते हा सामना सहन जिंकतील अशी भविष्यवाणी केली होती.

आता लक्ष्य दुसऱ्या WTC चे

न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाने आता दुसऱ्या अजिंक्यपदावर आपला फोकस केला आहे. दुसरी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जुलै 2021 ते 2023 दरम्यान खेळली जाणार आहे. या दरम्यान टीम इंडिया कसोटी मालिका खेळणार असून यातील तीन कसोटी मालिका घरच्या मैदानावर, तर तीन विदेशात खेळणार आहे.

संघ बदलाचे संकेत

दरम्यान, टीम इंडियामध्ये संघ बदलाचे वारे वाहत आहे. विराट कोहली याने देखील याचे संकेत दिले आहेत. अंतिम लढतीमध्ये खराब कामगिरी करणाऱ्या चेतेश्वर पुजारावर टांगती तलवार असून अन्य काही सिनियर खेळाडूही रडारवर आहेत.