‘राफेल’ करारावरून काँग्रेस पुन्हा ‘ऍटॅकिंग मोड’वर; सांगा, मोदी जेपीसी चौकशी का टाळताहेत? राहुल गांधींनी सुरू केली जनमत चाचणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राफेल लढाऊ विमानांच्या वादग्रस्त व्यवहारावरून काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राफेल करारावरून रविवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत ट्विट केले. मोदी संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) चौकशीला का तयार होत नाहीत, असा खडा सवाल करीत त्यांनी थेट ट्विटरवरूनच जनमत चाचणी सुरू केली आहे.

राफेल विमाने खरेदीबाबत हिंदुस्थानने फ्रान्सशी केलेला 59 हजार कोटींचा व्यवहार चौकशीच्या फेऱयात सापडला आहे. फ्रान्सने या व्यवहाराची न्यायालयीन चौकशी सुरू केली आहे. याचदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधींनी वादग्रस्त करारावर स्वाक्षरी करणाऱया मोदी सरकारला काsंडीत पकडले आहे. यासंदर्भात त्यांनी रविवारी पुन्हा ट्विट केले. जनमत चाचणीतील निष्कर्षाच्या आधारे मोदी सरकारला जेपीसी चौकशी करण्यास भाग पाडण्याची तयारी काँग्रेसने केली आहे.

डसॉल्ट पंपनीने गिफ्टच्या नावाखाली दिले 4.39 कोटी

फ्रान्सच्या मीडियाने तेथील भ्रष्टाचारविरोधी यंत्रणेच्या चौकशीतील धक्कादायक बाबींचा उलगडा केला आहे. राफेल विमाने बनवणाऱया डसॉल्ट पंपनीने पैशांचे बोगस व्यवहार केले होते. पंपनीने ग्राहकाला गिफ्ट दिल्याच्या नावाखाली 4.39 कोटींचा खर्च दाखवला आहे. 2017मधील बँक खात्याच्या ऑडिटमधून हा संशयास्पद खर्च निदर्शनास आला आहे. एवढी मोठी रक्कम गिफ्ट देण्यामागील ठोस कारण मात्र दिलेले नाही.

हिंमत असेल तर मोदींनी प्रश्नांची उत्तरे द्यावीत!

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनीही दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर हल्ला चढवला. फ्रान्सने चौकशीचा आदेश दिला, मग मोदी सरकार गप्प का, असा खडा सवाल करतानाच हिंमत असेल तर मोदींनी पत्रकार परिषद घेऊन राफेल करारासंबंधी प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे आव्हान खेडा यांनी दिले आहे. या प्रकरणात संपूर्ण जगाचे दिल्लीकडे लक्ष लागले आहे. ज्या देशाला फायदा झाला तो देश चौकशी करीत आहे. परंतु ज्या देशातील लोकांच्या कराचा पैसा लुटला त्या देशात चौकशी होत नाही, अशी टीका खेडा यांनी केली.

राहुल यांनी इन्स्टाग्रामवर एका व्यक्तीचा अर्धा चेहरा पोस्ट करीत त्यावर ‘चोर की दाढी’ असे लिहिले. त्यात त्यांनी कुणाचे नाव घेतलेले नाही. मात्र छायाचित्रातील दाढी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच असल्याचे दिसत आहे.

हे छायाचित्र राहुल गांधी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे

  • मोदींना गुन्हा घडल्याचे मान्य आहे
  • त्यांना आपल्या मित्रांना वाचवायचे आहे
  • संयुक्त संसदीय समितीला राज्यसभेच्या जागा नकोत
  • हे सर्व पर्याय बरोबर आहेत

असे चार पर्याय ट्विट करीत राहुल गांधींनी राफेल कराराबाबत सोशल मीडियात जनमत जाणून घेण्यास सुरुवात केली आहे.