
मध्य प्रदेशात आता मॉन्सूनने चांगलाच वेग घेतला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होत असल्याने दुर्घनांचे प्रमाणही वाढले आहे. मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात 48 तासात वीज कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 17 जण जखमी झाले आहेत. पन्ना जिल्ह्यातील उरेहा, पिपरिया दौन, चौमुखा आणि सिमराखुर्दसह पाच गावात वीज कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.
उरेहातील शेतात काम करत असताना वीज कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला. तर 11 जण जखमी झाले आहेत. तर पिपरीया दौन, चौमुखा आणि सिमरीखुर्दसह चार गावात वीज कोसळून 4 जणांचा मृ्त्यू झाला आहे. तर 7 जण जखमी झाले आहेत. एकाच जिल्ह्यात वीज कोसळून मोठ्या प्रमाणात जीवीतहानी झाली आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देत जखमींवर उपचार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना अंत्यसंस्कारासाठी तातडीने 5 हजार रुपयांची मदत प्रशासनाकडून देण्यात आली आहे.सरकारकडून मदतनिधीचे चार लाख रुपयेही मृतांच्या कटुंबियांना लवकरच देण्यात येतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या महिन्याच्या सुरुवातीलाच राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात वीज कोसळून मोठ्या प्रमाणात जीवीतहानी झाली होती. त्यानंतर आता मध्य प्रदेशात 48 तासात वीज कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे.




























































