
दर बारा कोसांवर भाषा बदलते असं म्हटलं जातं. खरंतर भाषा बदलत नसते तर बोलीभाषा बदलत असते. बोलीभाषा हे आपल्या भाषेचे वैभव आहे आणि ते जपले पाहिजे याच भावनेतून राज्यातील काही शिक्षकांनी एकत्र येऊन ‘माझी मायबोली’ हा उपक्रम सुरू केला आहे. यात एक कविता निवडून तिचा अनुवाद अनेक बोलीभाषांमध्ये केला जातो. अलीकडेच आषाढी एकादशीला ककयित्री शांताबाई शेळके यांच्या ‘एकादशी’ या कवितेचा महाराष्ट्रातील विविध 21 बोलीभाषांमध्ये अनुवाद सादर झाला. सोशल मीडियावर हा अनुवाद मोठय़ा प्रमाणात शेअर झाला. शिक्षकांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
एक कविता अनेक बोलीभाषांमध्ये अनुवादित करण्याच्या उपक्रमाची मूळ संकल्पना नितीन खंडाळे यांची. ते चाळीसगाक येथे प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. अहिराणी ही त्यांची बोलीभाषा. तीन-चार वर्षांपूर्वी त्यांनी कविवर्य विंदा करंदीकर यांची ‘विठ्ठल’ ही कविता सर्कात प्रथम अहिराणी भाषेत अनुवादित केली आणि फेसबुकला शेअर केली.
पंढरपूरच्या वेशीपाशी
आहे एक छोटी शाळा
सर्व मुले आहेत गोरी
एक मुलगा कुट्ट काळा
अशी मूळ कविता आहे. तिचे अहिराणी रूपांतर –
‘पंढरपूरना शीवजोगे, एक शे धावली शाया
सम्दा पोरे शेतस गोरा, एक पोऱया किट्ट काया।।
‘विठ्ठल’चे अहिराणीमध्ये केलेले हे रुपांतर अनेकांना आकडले. त्यानंतर अन्य काही शिक्षकांनी आपल्या बोलीभाषेत ‘विठ्ठल’ कवितेचा अनुवाद केला. अशा तऱहेने मालवणी, आगरी, कऱहाडी अशा अनेक बोलीत ही ककिता अनुकादित झाली. सुरुवातीला सहा बोलीभाषा, मग 12, त्यानंतर 22 आणि आता बोलीभाषेतील 26 अनुवादित कवितांपर्यंत ‘माझी मायबोली’ ग्रुपचा किस्तार झालाय.
कविवर्य नारायण सुर्वे यांच्या ‘नेहरू गेले त्या वेळची गोष्ट’, ज्ञानपीठप्राप्त कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची ‘कणा’, ज्ञानपीठप्राप्त कविकर्य किंदा करंदीकर यांची ‘देणाऱयाने देत जावे’, बा.सी. मर्ढेकर यांची ‘किती तरी दिवसात’ अशा 25 कविता बोलीभाषेत अनुवादित झाल्या आहेत.
बोलीभाषांचे वैभव
अहिराणी, बागलाणी, बंजारा गोरबोली, मराठवाडी, लेका गनबोली, खान्देशी तावडी बोली, तडवी भिल बोली, परदेशी बोली, खान्देशी गुजर बोली, वऱहाडी, नगरी बोली, मालवणी, आगरी बोली, पोकारी, झाडीबोली, आदिवासी मावची बोली, डांगाणी बोली, मानवरी बोली, पावरी बोली, पंढरपुरी बोली, वारली बोली, दखनी बोली अशा कित्येक बोलीभाषांमध्ये ‘माझी मायबोली’ ग्रुपवर कवाृिता अनुवादित होत आहेत.
‘माझी मायबोली’ या व्हाॅट्सअप ग्रुपवर एक कविता निश्चित केली जाते. समूहातील शिक्षक आपापल्या बोलीभाषेमध्ये तिचा अनुवाद करतात. या प्रयोगामुळे बोली टिकून राहण्यास मदत होईल. – नितीन खंडाळे, चाळीसगाक





























































