
‘सैराट’ चित्रपटातील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. या चित्रपटात परश्याची पुरेपूर साथ देणारे त्याचे दोन मित्र बाळय़ा आणि सल्या यांच्या लक्षवेधी भूमिका प्रेक्षक अजूनही विसरले नाहीत. हीच जोडी आता छोटय़ा पडद्यावर झळकणार आहे. झी मराठीवरील ‘मन झालं बाजिंद’ या आगामी मालिकेतून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांच्या व्यक्तिरेखेबद्दलची माहिती अजून गुलदस्त्यात असली तरी पण हे दोघे आपल्या तुफान अभिनय कौशल्याने प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करणार यात शंकाच नाही.या मालिकेतून अभिनेता वैभव चव्हाण आणि अभिनेत्री श्वेता राजन हे दोघे पहिल्यांदाच मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांना भेटणार आहेत. या मालिकेचे दिग्दर्शन अनिकेत साने यांनी केले आहे.

























































