
अफगाणिस्तानमध्ये तालिबानी दहशतवाद्यांनी कब्ला केल्यापासून येथे अडकलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ‘ऑपरेशन देवी शक्ती’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. याच अंतर्गत मंगळवारी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधून 78 प्रवाशांना घेऊन एक विमान हिंदुस्थानमध्ये परतले. मात्र यातील 16 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
काबूलहून आलेल्या विमानामध्ये अफगाणिस्तानच्या गुरुद्वारांमधून गुरु ग्रंथ साहिब घेऊन तीन शिखही हिंदुस्थानमध्ये आले होते. या तिघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हिंदुस्थानमध्ये परतल्यानंतर या तिघांची केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी आणि अन्य नेत्यांनी भेट घेतली होती.
दरम्यान, काबूलहून आलेल्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. मंगळवारी आलेल्या 78 जणांपैकी 16 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्यांमध्ये कोणतेही गंभीर लक्षण आढळलेले नाहीत. या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे.
Delhi | 78 people including children who arrived from Afghanistan earlier today are being taken from Delhi airport to ITBP’s Chhawla Camp where they will undergo mandatory 14-day institutional quarantine: Rajeev Kumar, Sub-Divisional Magistrate (SDM), Gandhi Nagar pic.twitter.com/wfZoTshYTw
— ANI (@ANI) August 24, 2021
‘ऑपरेशन देवी शक्ती’
अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या हिंदुस्थाना नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी ‘ऑपरेशन देवी शक्ती’ मोहीम सुरू आहे. या अंतर्गत आतापर्यंत 500 हिंदुस्थानी नागरिकांना अफगाणिस्तानमधून बाहेर काढण्यात आले आहे. हिंदुस्थान दररोज 2 विमानांच्या मदतीने येथे अडकलेल्या नागरिकांची सुटका करत आहे.
























































