रेल्वेच्या भोंग्यामुळे लोअर परळमधील रहिवासी त्रस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परळ येथील पश्चिम रेल्वे वर्कशॉपमध्ये कर्मचाऱ्यांसाठी वाजणाऱ्या कर्णकर्कश भोंग्यामुळे येथील स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. सकाळी पावणेसात वाजल्यापासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत ठरावीक वेळी वाजणाऱ्या या भोंग्यामुळे स्थानिकांची झोपच उडाली आहे. या ध्वनिप्रदूषणाचा परिणाम आबालवृद्धांवर होत आहे. त्यामुळे भोंगा वाजविण्याची पद्धत रेल्वेने बंद करावी, अशी मागणी येथील रहिवासी करीत आहेत.

रेल्वे वर्कशॉपमध्ये येणाऱ्या कर्मचारी, कामगारांना कामाची, जेवणाची, घरी जाण्याच्या वेळेची माहिती देण्यासाठी भोंगा वाजविला जातो. सकाळी पावणेसात ते चार वाजेपर्यंत ठरावीक वेळेत भोंग्याचा आवाज ऐकू येत असल्याने स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.