
फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या प्लॅटफॉर्मवरच्या कंटेंट क्रिएटर्सना त्यांच्या कंटेंटमधून उत्पन्नही मिळवता यावे, या दृष्टीने फेसबुक नवनवीन फिचर्स आणत आहे. आता अशी आणखी काही टूल्स आणली जाणार असून त्यासाठी कंटेंट क्रिएटर्सना खास प्रशिक्षण देण्याचा उपक्रमही फेसबुकने सुरू केला आहे.
कंपनीने क्रिएटर एज्युकेशन अॅण्ड एनेबलमेंट प्रोग्राम लाँच केला आहे. त्यामुळे कंटेंट क्रिएटर्सच्या ज्ञानात भर पडून त्यांना आपले उत्पन्न वाढवता येण्यास मदत होणार आहे. फेसबुक इंडियाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन म्हणाले, क्रिएटर्ससाठी शिकणे हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. क्रिएटर्सना ऑनलाइन लर्निंग कोर्सच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाईल. कोर्सनंतर प्रमाणपत्र दिले जाईल. यामुळे आम्हाला जास्तीत जास्त क्रिएटर्सपर्यंत पोहोचवण्यास मदत होईल.































































