
वन्यजिवांच्या सुरक्षेसाठी आणि संवर्धनासाठी व्यापक उपाययोजना सुचवणाऱया राज्य वन्यजीव कृती आराखडय़ास आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या 17व्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 2021 ते 2030 या दहा वर्षांच्या काळाकरिता हा कृती आराखडा तयार करण्यात आला असून असा आराखडा तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या आराखडय़ाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिले.
बैठकीच्या प्रारंभी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘ठिपकेदार मुंबईकर ः आरेमधील बिबटे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले तसेच वन विभागाने मागील दोन वर्षांत वन आणि वन्यजीव संवर्धनासाठी केलेल्या कामाची माहिती देणारी ध्वनी चित्रफीतही दाखवण्यात आली. या वेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्याच्या वन विभागात जलद कृती दलाची स्थापना करणे आणि त्यासाठी अतिरिक्त पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे विचारार्थ पाठवण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीस पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, विधानसभा सदस्य धीरज देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांच्यासह प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) जी साईप्रकाश, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये आदी उपस्थित होते.
सनियंत्रण समिती स्थापन करा – आदित्य ठाकरे
या आराखडय़ाची अंमलबजावणी व्यवस्थित होत आहे की नाही हे पाहण्यासाठी सनियंत्रण समितीची स्थापना करावी, अशी सूचना पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी या वेळी केली.
असा आहे राज्य कन्यजीक कृती आराखडा
राज्य वन्यजीव कृती आराखडा 12 प्रकरणात विभागला असून यात दुर्मिळ प्रजातींचे संवर्धन, शिकार आणि वन्यजिवांच्या अवैध व्यापारावर नियंत्रण, मानव वन्यजीव संघर्षावर उपाययोजना व बचाव कार्य, वन्यजिवांचे आरोग्य व्यवस्थापन, प्रादेशिक भूप्रदेशातील जल परिसंस्थेची संवर्धन प्रणाली, किनारी आणि सागरी परिसंस्थांचे संवर्धन, वन्यजीव क्षेत्रातील पर्यटन व्यवस्थापन, संवर्धनाची जाणीव-जागरूकता, लोकसहभाग आदी बाबींचा समावेश आहे.
मानक–बिबटय़ा संघर्ष उपाययोजना
मानव-बिबटय़ा संघर्षावर उपाययोजना सुचविण्याकरिता स्थापन करण्यात आलेल्या अभ्यासगटाने सादर केलेल्या अहवालातील शिफारशींवरदेखील बैठकीत चर्चा करण्यात येऊन त्यास मंजुरी देण्यात आली. यात राज्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
अंधारी अभयारण्य क्षेत्र 78.79 कर्ग कि.मी. ने वाढवले
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अंधारी अभयारण्य क्षेत्राचे विस्तारीकरण करणे आणि वाढ झालेले क्षेत्र ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात समाविष्ट करण्यासदेखील आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अंधारी वन्यजीव अभयारण्य हे एकूण 509.27 वर्ग कि.मी. क्षेत्रावर पसरलेले आहे. या अभयारण्याला लागून असलेल्या बफर क्षेत्रातदेखील उत्तम वनाच्छादन असून हे क्षेत्र जैवविविधतेने समृद्ध आहे. येथे उत्तर-पूर्व वनक्षेत्रात वाघांचा चांगला वावर आहे. त्यामुळे अभयारण्याचा एकूण 78.89 वर्ग कि.मी. क्षेत्राने विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मानक–क्याघ्र संघर्ष उपाययोजना
चंद्रपूर जिल्ह्यातील मानव व्याघ्र संघर्षावर उपाययोजना सुचविण्याकरिता स्थापन करण्यात आलेल्या अभ्यासगटाने सादर केलेल्या अहवालातील शिफारशींवर बैठकीत चर्चा करण्यात येऊन त्यास मंजुरी देण्यात आली. यात चार क्षेत्रांची निश्चिती करण्यात आली असून समितीने क्षेत्रनिहाय महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत.





























































