
मोठय़ा प्रतीक्षेनंतर जिओ फोन नेक्स्ट हा 4 जी स्मार्टफोन विक्रीसाठी आला आहे. जिओ आणि गुगल यांनी एकत्रित विकसित केलेला हा स्मार्टफोन सर्वात स्वस्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 6 हजार 499 रुपये इतकी असली तरी ग्राहक 1 हजार 999 रुपयांत हा फोन खरेदी करू शकता. उर्वरित रक्कम 18 किंवा 24 महिन्यांपर्यंत हप्त्यामध्ये भरता येणार आहे. जिओने दावा केला आहे की, हो फोन एका वेळी पूर्ण चार्ज केल्यानंतर बॅटरी 36 तासांपर्यंत चालणार आहे.
जिओ फोन नेक्स्टमध्ये प्रगती ओएसचे फिचर्स असून वॉईस असिस्टेंट, रिड अलाऊड, ट्रान्सलेटर, जिओ, गुगल ऍप्स प्रीलोडेड, ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर अपडेट यांसारखे अनेक फिचर्स या फोनमध्ये आहेत. याशिवाय फोनमध्ये दोन सिम स्लॉट देण्यात आले असून डेटा कनेक्शन केवळ जिओ सिममधून घेता येणार आहे. दुसऱया कोणत्याही कंपनीचे सिम हे केवळ कॉलिंग आणि मेसेज सुविधेसाठीच असणार आहे.
फोनमध्ये 5.45 इंचाची एचडी टचस्क्रीन देण्यात आली आहे. फोनमध्ये 2 जीबी रॅम, 32 जाबी स्टोअरेज, 512 जीबीपर्यंत सपोर्ट करणारे एसडी कार्ड स्लॉट, मल्टीटास्किंगसाठी 64 बीट सीपीयूसह क्वाड कोअर क्यूएम 215 चिपसेट दिले आहे. तसेच 13 मेगापिक्सलचा रिअर आणि 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असून तो नाईट मोड, पोट्रेट मोड आणि एचडीआर मोडवर सपोर्ट करतो. फोनमध्ये हॉटस्पॉटचा ऑप्शनही देण्यात आला आहे.
























































