ग्लोबल रिस्पॉन्सिबल टुरिझम पुरस्कारावर महाराष्ट्राची मोहर, वेगवेगळ्या गटातत तीन संस्थांना मिळाले पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक स्तरावरील डब्ल्यूटीडब्ल्यू ग्लोबल रिस्पॉन्सिबल टरिझम पुरस्कारांकर यंदा महाराष्ट्राने आपली मोहर उमटवली आहे. पालघर जिह्यातील गोवर्धन इको व्हिलेजने डिकार्बेनायझिंग ट्रॅव्हल ऍण्ड टुरिझम श्रेणीत, मुंबईतील नो फुटप्रिंट उपक्रमाने पर्यटनातील विविधता वाढवण्यासाठी आपला उपक्रम किती समावेशक आहे. या गटात तर व्हिलेज के मुंबई यांनी ग्रोईंग द लोकल इकॉनॉमिक बेनिफिट या श्रेणीतील पुरस्कार मिळवले असून त्यांना संबंधित गटात सवर्णपदक प्राप्त झाल्याचे महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

रिस्पॉन्सिबल टुरिझम पार्टनरशिप आणि वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केटच्या वतीने हिंदुस्थान, आफ्रिका, लॅटिन अमेरिकेसह विविध देशांसाठी 6 जुलै ते 31 ऑगस्ट या कालावधीत जागतिक स्तरावरील पुरस्कारांचे आयोजन केले होते. यामध्ये हिंदुस्थानने सहापैकी चार पुरस्कारांवर आपले नाव कोरत पर्यटन क्षेत्रातील आपली क्षमता सिद्ध केली आहे. यासोबतच टायगर ट्रेल्स जंगल लॉजेस, चिचघाट कंझर्व्हन्सीने डेस्टीनेशन बिल्डिंग बॅक या श्रेणीत पुरस्कार मिळवला आहे. प्रवास आणि आणि पर्यटनाचे डिकार्बेनायझेशन, साथीच्या आजारातून कर्मचारी, समुदाय टिकवून ठेकणे, कोविडनंतरच्या उत्तम पर्यटनस्थळांची उभारणी, पर्यटनातील विविधता वाढवणे, पर्यावरणातील प्लास्टिक कचरा कमी करणे या श्रेणींमध्ये पुरस्कार देण्यात आले. ग्लोबल रिस्पॉन्सिबल टुरझिम अवॉर्ड जिंकणे हे आमच्यासाठी प्रेरणादायी असल्याचे व्हिलेज केच्या व्यवस्थापकीय संचालक मनिषा पांडे यांनी सांगितले.