मुंबईतल्या वाहतूककोंडीवर जलवाहतुकीची मात्रा, 534 कोटींचा प्रकल्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राजेश चुरी

मुंबईपासून अगदी थेट ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि महानगर प्रदेशातल्या रस्त्यांवरील वाहतूककाsंडी दूर करून वेगवान प्रवासासाठी तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘सागरमाला’ योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत राज्य व पेंद्र सरकार मिळून डोंबिवली, बेलापूर, वसईतील नारिंगी, काशिद, अर्नाळा, उरण, मोरा, एलिफंटा, जंजिरा आणि गेट वे ऑफ इंडियाजवळील रेडिओ क्लबजवळ जलवाहतुकीसाठी सुमारे 534 कोटी 60 लाख रुपये खर्च करून आठ ठिकाणी जेटी बांधण्यात येत आहेत.

रो पॅक्स सेवा यशस्वी

रस्त्यावरील वाहतूककाsंडी कमी करण्याच्या दृष्टीने नवीन भाऊचा धक्का ते मांडवा बंदर अशी रो पॅक्स फेरी सेवा मार्चपासून सुरू झाली. मुंबईतून अलिबागला रस्तेमार्गे पोहोचण्यासाठी तीन ते चार तास लागतात, पण मुंबईवरून मांडवा जेटीला रो पॅक्स बोट पाऊण तासात पोहोचते.

मुरुड-अर्नाळा किनाऱयावर जेटी

रायगड जिह्यातल्या मुरुड तालुक्यातील काशिद येथे पर्यटनासाठी जेटी विकसित करण्यात येत आहे तसेच वसई तालुक्यातील अर्नाळा किल्ला येथे प्रवासी जेटी बांधण्याची योजना आहे. हा प्रकल्प सध्या निविदा स्तरावर आहे.

सागरमाला प्रकल्प

राज्यात जलवाहतुकीला चालना देण्यासाठी पेंद्र सरकारने ‘सागरमाला’ ही महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. या योजनेत पेंद्र सरकार 50 टक्के निधी तर राज्य सरकारतर्फे 50 टक्के निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत जलपर्यटनाला चालना देण्यासाठी बेलापूर येथे सध्या जेटी विकसित करण्यात येत आहे

कुलाब्याला जेटी

‘सागरमाला’ योजनेअंतर्गत दक्षिण मुंबई ताज हॉटेलजवळ रेडिओ क्लब येथे जेटी व टर्मिनल इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. घारापुरी बेटांवर सध्याच्या जेटीचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. मुरुड तालुक्यातील जंजिरा किल्ला येथे जेटीचे बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती बंदर विकासमंत्री अस्लम शेख यांनी दिली.

जलपर्यटनाला चालना

महाराष्ट्राला लाभलेल्या सुंदर किनारपट्टीवर जलपर्यटनाला चालना देण्यासाठी उंदेरी दिवेआगर, पद्मदुर्ग, वेलदूर, सुवर्णदुर्ग, गुहागर, दुर्गाडी किल्ला येथे पर्यटकांसाठी जेटीचे बांधकाम करण्यात येणार आहे. पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ हे महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डमार्फत ही कामे करण्यात येणार आहेत.