
25 हजारांची लाच स्वीकारताना चंद्रपूरमधील तहसीलदारास रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. वीटभट्टीसाठी लागणारी लाल माती उत्खननाची परवानगी देण्यासाठी 25 हजारांची मागितली होती. डॉ. निलेश खटके असे तहसीलदाराचे नाव असून ते भद्रावती येथे कार्यरत होते.































































