
अबुधाबीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी दहशतवाद्यांनी मोठा ड्रोनहल्ला केला. यात लागोपाठ तीन तेल टँकर्सचा स्पह्ट होऊन विमानतळावर आगीचा जबरदस्त भडका उडाला. स्पह्टांमध्ये दोन हिंदुस्थानी आणि एका पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले आहेत. जागतिक पातळीवरील प्रमुख व्यापार पेंद्र असलेल्या दुबईपासून अवघ्या 140 किलोमीटरवर हा हल्ला केला गेल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. येमेनच्या हुथी बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हुथी बंडखोरांनी आणखी हल्ल्यांची धमकी दिल्याने सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे.
विमानतळावर भयंकर हल्ला घडवण्याचा कट होता!
हुथी बंडखोरांनी गेल्या वर्षी दोन वेळा सौदीच्या दोन विमानतळांवर निशाणा साधला होता. मात्र येथील सर्वात मोठय़ा आंतरराष्ट्रीय विमानतळावर भयंकर ड्रोनहल्ला करण्याचा पहिल्यांदाच प्रयत्न केला गेला. अबुधाबी विमानतळावरील हा ड्रोनहल्ला मोठय़ा दहशतवादी कटाचा भाग असू शकतो, असे यूएईच्या स्थानिक मीडियाने म्हटले आहे.
हल्ले सुरूच ठेवणार; हुथी बंडखोरांची धमकी
विमानतळावरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेल्या हुथी बंडखोरांनी संयुक्त अरब अमिरातीत दहशतवादी हल्ले सुरूच ठेवणार असल्याची धमकी दिली आहे. लवकरच यूएईवर लष्करी कारवाई करणार असल्याचा दावा हुथीचा प्रवक्ता याह्या सारी याने ट्विटर अकाऊंटवरून केला आहे. यूएई दीर्घकाळापासून येमेनमधील गृहयुद्धात होरपळले आहे. युएईने 2015 मध्ये येमेनमध्ये सरकार बदलण्यासाठी हुथी बंडखोरांविरुद्ध मोहीम सुरू केली होती. त्यानंतर पेटून उठलेल्या हुथी बंडखोरांनी ड्रोनहल्ल्यांचा धडाका सुरू ठेवला आहे.
























































