रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा पुन्हा गजबजल्या; 2775 शाळा पुन्हा सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मंगळवारपासून रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळा आणि अकरावी, बारावीचे महाविद्यालयीन वर्ग सुरु झाले. जिल्हा परिषदेच्या 2335 शाळा, खासगी प्राथमिक 83 शाळा, खासगी माध्यमिक 357 अशा एकूण 2775 शाळा सुरु झाल्या.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील शाळा महिनाभर बंद होत्या. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने पुन्हा शाळा सुरु झाल्या आहेत. त्यामध्ये मंडणगड तालुक्यातील 179 शाळा, दापोली तालुक्यातील 319 शाळा, खेड तालुक्यातील 392 शाळा, चिपळूण तालुक्यातील 409 शाळा, गुहागर तालुक्यातील 217 शाळा, संगमेश्वर तालुक्यातील 395 शाळा, रत्नागिरी तालुक्यातील 404 शाळा, लांजा तालुक्यातील 206 शाळा, राजापूर तालुक्यातील 254 शाळा मंगळवारपासून सुरु झाल्या आहेत. संगमेश्वर तालुक्यातील 10 शाळा सुरु करण्यास व्यवस्थापन समितीने नकार दिला.