
दैनदिन त्रासातून सुटका करत रविवारची सुट्टी आरोग्य व आनंददायी व्हावी या करिता मुंबई पोलिसांनी नागरीकांसाठी खास ‘संडेस्ट्रिट’ ही संकल्पना आणली आहे. रविवारपासून हा उपक्रम सुरू होणार असल्याने यात सहभागी होणाऱ्यांसाठी पोलिसांनी काही सुचना केल्या असून त्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संडेस्ट्रिटमध्ये नागरीकांना चालणे, धावण्याबरोबर स्केटिंग, योगा, सायकलिंग, मंनोरंजनाचे कार्यक्रम करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे रोजच्या कटकटीतून विरंगुळा व त्यातुन तणावमुक्तीसाठी नागरीकांनी संडेस्ट्रिटमध्ये सहभागी व्हावे, असे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आवाहन केले आहे.
संडेस्ट्रटिट मध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरीकांनी काय करू नये याबाबत पोलिसांनी सुचना केल्या असून त्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
* राजकीय व धार्मिक कार्यक्रम करू नका
* मद्यपान, धुम्रपानास सक्त मनाई असेल
* व्यावसायिक जाहिरातबाजी करू नका
* ध्वनीक्षेपक वापरण्यावर मनाई असणार आहे.
*परिसरात स्वच्छता ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असेल
याव्यतिरिक्त कार्यक्रम स्थळी येण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास सांगितले असून कोविड नियमांचा तसेच पोलिसांकडून देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करावे. कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्व नागरीकांनी काळजी घेण्याबाबत पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
येत्या रविवारी पहाटे सहा ते दहा या वेळेत शहरातील मरिन ड्राईव्ह येथील दोराभाई टाटा रोड, विक्रोळी येथील ईस्टन एक्सप्रेस हायवेवरील ब्रिज खाली, मुलूंड येथुल तानसा पाईप लाईन, गोरेगाव येथील माईंड स्पेस मागील रस्ता, डि.एन. नगर येथील लोखंडवाला मार्ग आणि वांद्रे येथील कार्टर रोड हे मार्ग एकेरी अथवा वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद करून त्या मार्गांवर नागरीकांना योगा, सायकलिंग, स्कैटिंग, सांस्कृतिक खेळ यासारखे कार्यक्रम राबवून त्यांचा आनंद लुटता येणार आहे.
































































